Ad will apear here
Next
तटरक्षक जवानांना राख्या बांधून दिव्यांगांचे रक्षाबंधन


रत्नागिरी :
 येथील आविष्कार संस्थेच्या श्यामराव भिडे कार्यशाळेच्या दहा दिव्यांग विद्यार्थ्यांनी विमानतळ परिसरातील भारतीय तटरक्षक दलाच्या कार्यालयात जवानांना राख्या बांधून रक्षाबंधन सण साजरा केला. याच विद्यार्थिनींनी जहाजांवर समुद्रसीमेचे संरक्षण करणाऱ्या जवानांसाठीही राख्या पाठविल्या आहेत.

या वेळी कार्यशाळेच्या प्राची पाटील व बोराडे या शिक्षिकांनी कार्यशाळेच्या कार्याबद्दल जवानांना माहिती दिली. कार्यशाळा १८ वर्षांवरील दिव्यांग विद्यार्थ्यांना व्यावसायिक प्रशिक्षण देत असून, आतापर्यंत ८० विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. संस्थेत अठरा शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी कार्यरत आहेत. मेणबत्त्या, अगरबत्त्या, फाइल्स, पर्स, कृत्रिम दागिने, राख्या आदी वस्तू बनविण्याचे, तसेच राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर विविध स्पर्धांमध्ये यशस्वितेसाठी येथे प्रशिक्षण दिले जात असल्याचे पाटील यांनी सांगितले. 

भारतीय तटरक्षक दलाचे कमांडिंग ऑफिसर, कमांडंट एस. आर. पाटील यांनी विद्यार्थ्यांच्या कौशल्यांचे कौतुक केले. ‘दिव्यांग विद्यार्थ्यांनी केलेली कामगिरी जवानांसाठी प्रेरणादायी आहे. देशवासीयांचे संरक्षण करताना सार्थ अभिमान आहे,’ असे मत त्यांनी व्यक्त केले. 

फिनोलेक्स इंडस्ट्रीज संचालित मुकुल माधव विद्यालयाच्या पाच विद्यार्थिनींनीही जवानांना राख्या बांधून रक्षाबंधनाचा सण साजरा केला. या वेळी विद्यालयाच्या अधीक्षक राधा करमरकर, शाळेचे रजिस्ट्रार व विद्यार्थ्यांचे पालक उपस्थित होते. ‘कन्याकुमारी ते जम्मू काश्मीरपर्यंतचे जे जवान रत्नागिरीत कार्यरत आहेत, त्यांना रक्षाबंधनाच्या निमित्ताने या विद्यार्थ्यांनी जो जिव्हाळा व प्रेम दिले, त्यामुळे आम्ही व आमचे जवान कृतकृत्य झालो,’ अशी भावना कमांडंट पाटील यांनी व्यक्त केली.

(‘आविष्कार’ या संस्थेच्या कार्याविषयी सविस्तर माहिती देणारा लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा. गुरुकुलच्या विद्यार्थ्यांनी रत्नागिरीतील मूकबधिर विद्यालयात जाऊन रक्षाबंधन साजरे केले, त्याबद्दलची सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/VZLWBR
Similar Posts
निसर्गरक्षणाचा संदेश देणाऱ्या राखीचा ‘आविष्कार’ रत्नागिरी : मतिमंदांसाठी कार्यरत असलेल्या आविष्कार संस्थेच्या श्यामराव भिडे कार्यशाळेतील विद्यार्थी यंदा लागवड करता येण्यायोग्य बीजराख्या म्हणजेच प्लांटेबल सीड राख्या तयार करत आहेत. रक्षाबंधन झाल्यानंतर या राख्या कुंडीत किंवा मातीत घातल्यास त्यातून फुले-फळे देणाऱ्या वनस्पती रुजणार आहेत. या पर्यावरणपूरक
‘आविष्कार’ घडविणारी रौप्यमहोत्सवी संस्था मूल मतिमंद असले, तरी त्याच्यातही काही सुप्त गुण असतातच. मतिमंदत्वामुळे ‘निरुपयोगी’ असा शिक्का मारून अशा मुलांना दूर न ढकलता त्यांच्यामध्ये असलेल्या सुप्त गुणांचा शोध घेणे, त्यांचा विकास करणे आणि त्यातूनच त्यांचे नवे आत्मनिर्भर व्यक्तिमत्त्व तयार करणे हे ध्येय उराशी बाळगून रत्नागिरीतील ‘आविष्कार’ संस्थेने
श्यामराव भिडे कार्यशाळेत दिव्यांग दिन उत्साहात रत्नागिरी : येथील आविष्कार संस्थेच्या श्यामराव भिडे कार्यशाळेत जागतिक दिव्यांग दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने ‘क्षण रंगलेले’ हा कार्यक्रम आयोजित केला होता.
‘मुकुल माधव’च्या विद्यार्थ्यांनी साकारल्या पर्यावरणपूरक गणेशमूर्ती रत्नागिरी : मुकुल माधव फाउंडेशनतर्फे रत्नागिरी येथील गोळपमध्ये चालविण्यात येणाऱ्या मुकुल माधव विद्यालयातील विद्यार्थ्यांनी सुबक व आकर्षक पर्यावरणपूरक गणेशमूर्ती साकारल्या. विद्यार्थ्यांनी साकारलेल्या याच मूर्तीची प्रतिष्ठापना शाळेच्या गणेशोत्सवात करण्यात आली.

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language